logo

रॉयल कॅनिनने भिवंडी येथे अत्याधुनिक पॅकेजिंग केंद्र सुरू केले

रॉयल कॅनिनने भिवंडी येथे अत्याधुनिक पॅकेजिंग केंद्र सुरू केले

सुमारे १०० कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक


मुकेश श्रीकृष्ण धावडे
मुंबई, २३ एप्रिल २०२४
मांजरी आणि कुत्र्यांसाठी ‘पोषणाच्या माध्यमातून आरोग्य’ समाधान देणाऱ्या आणि मार्स इन्कॉर्पोरेटेडचा भाग असलेल्या रॉयल कॅनिन या एका जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने आज महाराष्ट्रातील भिवंडी येथे आपले नवीन पॅकेजिंग केंद्र सुरू केल्याचे जाहीर केले. रॉयल कॅनिन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या एमओयूला अनुसरून रॉयल कॅनिनने सुरू केलेले हे पॅकेजिंग केंद्र म्हणजे भारतीय पेट केअर मार्केटप्रती रॉयल कॅनिनची वचनबद्धता आणखी मजबूत करणारा लक्षणीय टप्पा आहे.

‘पेट्ससाठी अधिक सुंदर जग’ या कल्पनेने प्रेरित होऊन रॉयल कॅनिनने सुमारे १०० कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक केली आहे आणि लक्षावधी मांजरी आणि कुत्रे यांची सेवा करण्यासाठीचे लवचिक उत्पादन नेटवर्क अधिक मजबूत बनवण्यासाठी तसेच गुणवत्ता, किफायतशिरता आणि उपलब्धता सुनिश्चित करून पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या आणि व्यावसायिकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक रोजगार आणि क्षमतांना वाव दिला आहे.

सदर नवीन पॅकेजिंग केंद्र ही रॉयल कॅनिनची भारतातील पहिली सुविधा आहे. यामध्ये स्वयंचलित पॅकिंग मशीन्स आणि संबंधित साधने असतील, ज्यांच्या मदतीने उत्पादनाच्या मोठ्या साठ्यामधून भारतीय पाळीव प्राण्यांच्या गरजा भागवू शकतील असे किरकोळ (रिटेल) पॅक बनवण्यात येतील.

रॉयल कॅनिनचे ग्लोबल प्रेसिडेंट सेसिल कूटन्स म्हणाले, “भारत हे अत्यंत झपाट्याने वाढत असलेले पेट केअर मार्केट आहे ज्याचा सीएजीआर जवळजवळ १५% आहे. आजकाल पाळीव प्राण्यांचे मालक आपल्या प्राण्यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या कल्याणाविषयी फारच जागरूक होऊ लागले आहेत आणि आपल्या लाडक्या प्राण्याला दर्जेदार पोषण आणि देखभाल देण्याची त्यांची इच्छा असते. रॉयल कॅनिनमध्ये आमचा हा दृढ विश्वास आहे की, पाळीव प्राण्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी नेमके पोषण हा श्रेष्ठ आणि सर्वात सोपा मार्ग आहे. भिवंडी येथे आमच्या नवीन पॅकेजिंग केंद्राचे संचालन सुरू झाल्यामुळे आम्ही भारतातील पाळीव प्राण्यांच्या मालकांना आणखी चांगली मदत करू शकू आणि त्यांना आपल्या लाडक्या प्राण्यासाठी ‘पोषणाच्या माध्यमातून आरोग्य’ उपाय नेमकेपणाने प्रदान करू शकू. इंडिया पॅकेजिंग सेंटर ही आमच्या उत्पादन नेटवर्कमधली १७ वी सुविधा आहे, जिच्यामुळे देशातील आमची पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल.”

रॉयल कॅनिनचे जनरल मॅनेजर, सतींदर सिंह म्हणाले, “आम्ही सहर्ष जाहीर करतो की, महाराष्ट्रातील आमची नवीन सुविधा आता संपूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. रॉयल कॅनिनमध्ये आम्ही जे काही करतो, ते ‘पेट्ससाठी अधिक सुंदर जग’ या आमच्या उद्देशाला अनुसरून असते. ही नवीन सुविधा आमच्या उपभोक्ता अनुभवाचा एक भाग आहे, जी आम्हाला अधिकाधिक मांजरी आणि कुत्र्यांना दर्जेदार पोषण देण्यास सक्षम करेल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या नवीन पॅकेजिंग केंद्राच्या संचालनातून भारतातील पेट्सच्या मालकांना त्यांच्या लाडक्या प्राण्यांच्या गरजेनुसार उत्तम उत्पादने प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दिसून येते. ही नवीन सुविधा भारत सरकारच्या भारतीय अर्थतंत्राला सहाय्यभूत ठरणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ अभियानास देखील अनुसारणारी आहे.

12
1595 views